0

पूनम पाटगवे / मुंबई

गोरेगाव पूर्व आरे येथील ओबेरॉय गार्डन सिटी मेट्रो स्थानकावर प्रवाशांची रास्ता ओलांडताना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी खासगी जागेतील जिना तात्पुरता सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक वापरासाठी बांधण्यात येणाऱ्या विस्तारित पादचारी पुलाचे भूमिपूजन सोमवारी ९ नोव्हेंबर  रोजी करण्यात आले. पद्मावती रोड आणि मोहन गोखले रोडच्या दिशेने मंजूर असलेला जिना विकासकाकडून दीड वर्षांपासून बांधण्यात आला नव्हता. याबाबत एमएमआरडीए आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत दोन वेळा स्थळ पाहणी करण्यात आली. त्यानंतर सहायक आयुक्त अनिरुद्ध कुलकर्णी, विकासक विकास ओबेरॉय आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत नवीन जिन्याचे काम पूर्ण होईपर्यंत खासगी जिना प्रवाशांसाठी खुला ठेवण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. सोमवारी सकाळी ११.३० वाजता खासगी जाण्याचे उदघाटन आणि विस्तारित पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या सुविधेमुळे दूधसागर वसाहत , साईबाबा कॉम्प्लेक्स, गोकुळधाम, यशोधाम, राम नगर, नित्यानंद नगर आणि आरे कॉलनीतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यावेळी मनीषा वायकर, स्वप्नील टेम्बवलकर, वर्षा टेम्बवलकर, ऍडव्होकेट दीप्ती वायकर पोटनिस यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.      

Post a Comment

 
Top