0
पूनम पाटगावे / जोगेश्वरी वार्ताहर 

जोगेश्वरी पूर्व प्रभाग ७३ आणि ७४ मधील जेव्हीएलआर मार्गावरील रामवाडी सिग्नल तसेच दत्त टेकडी परिसरातील स्पीड ब्रेकर खराब होऊन समतल झाल्याने वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी वेग नियंत्रणासाठी आवश्यक असलेले स्पीड ब्रेकर प्रभावी राहिले नसल्याने अपघातांचा धोका वाढत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. विशेषतः दुचाकीस्वारांकडून वेगाने वाहन चालविण्याच्या घटना घडत असल्याने ‘हिट अँड रन’ प्रकारांची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय या परिसरात रस्ता ओलांडण्यासाठी स्कायवॉकची सुविधा उपलब्ध नसल्याने पादचाऱ्यांना अधिक धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक अरुण नाचरे यांनी मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित ठिकाणी नव्याने स्पीड ब्रेकर बसविणे तसेच वेग मर्यादा दर्शविणारे फलक लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या संदर्भात प्रशासनाकडून लवकरात लवकर कार्यवाही होऊन परिसरातील वाहतूक सुरक्षितता वाढवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

---------

कुठल्याही प्रकारच्या लोन करिता, येथे क्लिक करा... एका तासात रकम तुमच्या खात्यात

http://sales.gromo.in/gp-website/g/yjLb6aXgd08ED8Vy6K1RP
Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment

 
Top