मि. प. वार्ताहर / अहिल्यानगर
अहिल्या नगर विभागात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीस अधिक बळकटी देण्यासाठी आणि महिलांमध्ये पक्षाची ध्येयधोरणे अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने सुश्री भावना गायके यांची अहिल्या नगर शिवसेना उद्योग व रोजगार विकास मंच चे महिला संघटक पदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव, समर्पित वृत्ती आणि स्थानिक महिलांमध्ये असलेला मजबूत जनसंपर्क यामुळे त्यांची ही नियुक्ती योग्य ठरली आहे.
शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मुंबई उपनगरातील खासदार मा. श्री. रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच प्रवक्ते मा. संजय निरुपम यांच्या प्रेरणेतून अध्यक्ष शैलेश जायसवाल यांनी त्यांना ही नियुक्ती दिली आहे. याच पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांना अधिक जबाबदाऱ्या देऊन संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सुश्री भावना गायके यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
नवीन संघटक म्हणून काम करताना त्या अहिल्या नगरमधील नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन ते थेट संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवतील आणि शिवसेनेच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे परिसरातील महिला कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला असून, संपूर्ण संघटनेतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
शिवसेनेची जनसंपर्क वाढवून, येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा किल्ला अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने सौ. भावना गायके यांची ही नियुक्ती एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
Post a Comment