अहिल्या नगर – महिला सशक्तीकरण, सामाजिक न्याय आणि पत्रकारितेतील सक्रिय सहभाग या उद्देशाने कार्यरत असलेल्या मिशन पत्रकारिता वूमन झोन च्या अहिल्या नगर सचिवपदी कु. तृप्ती कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संस्थेच्या अध्यक्षा सुश्री भावना गायके यांच्या नेतृत्वाखाली, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शैलेश जायसवाल यांच्या हस्ते अधिकृतपणे करण्यात आली.
कु. तृप्ती कराळे या सामाजिक भान, निर्भीड लेखन आणि तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ओळखल्या जातात. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचा अनुभव आणि तळमळ लक्षात घेता त्यांची ही निवड करण्यात आली असल्याचे अध्यक्ष शैलेश जायसवाल यांनी सांगितले.
नियुक्तीनंतर भावना व्यक्त करताना कु. कराळे म्हणाल्या, “मला दिलेली ही जबाबदारी ही एक संधी असून मी प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थ भावनेने माझे कर्तव्य पार पाडेन. महिला पत्रकारिता आणि सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे व्यासपीठ तयार करणे हे माझे ध्येय राहील.”
या वेळी संस्थेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आणि सर्वांनी नवनियुक्त सचिव तृप्ती कराळे यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
"मिशन पत्रकारिता वूमन झोन" ही संस्था देशभरात महिला पत्रकारांना सक्षम करण्यासाठी व सामाजिक प्रश्नांवर कार्यरत आहे. या नियुक्तीमुळे अहिल्या नगर विभागात महिलांच्या हक्कांबाबत पत्रकारितेचा प्रभाव अधिक वाढेल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
Post a Comment