0
जोगेश्वरी :- मिशन पत्रकारिता संचालित तथास्तु जनसेवा केंद्राच्या वतीने सर्वसामान्य नागरिक आणि गरजू कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत शासकीय योजना मार्गदर्शन व नोंदणी शिबिर बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडले. या शिबिरात शेकडो नागरिकांनी विविध शासकीय योजनांसाठी मार्गदर्शन व नोंदणी सुविधांचा लाभ घेतला.

खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनीषाताई वायकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या शिबिरात आयुष्मान भारत आरोग्य कार्ड, ई-श्रम कार्ड, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री जनधन बँक खाते आदी योजनांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना योजनांच्या नोंदणीसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहाय्यही करण्यात आले.

शासकीय योजनांची माहिती अनेकदा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जोगेश्वरी पूर्व येथील सुभाष नगर रोडवरील सार्वजनिक वाचनालय, सेटेलाईट बिझनेस पार्क, मेपल प्लाझासमोर असलेल्या तथास्तु जनसेवा केंद्रात हे शिबिर पार पडले. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे जनसेवेचे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजक व मिशन पत्रकारिता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शैलेश जायसवाल यांचेकडून सांगण्यात आले.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment

 
Top